पण, खिशात दमडी नाही…

वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर फिरायला जावं
मनसोक्त भ्रमंती करावी
तुझ्यासह पर्यटक व्हावं
पण, खिशात दमडी नाही…

वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर जेवायला जावं
चवदार, खमंग पदार्थ खावं
तुझ्यासह खवय्या व्हावं
पण, खिशात दमडी नाही…

वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर मनोरंजन करावं
कला, नृत्य, सिनेमा बघावं
तुझ्यासह रसिक व्हावं
पण, खिशात दमडी नाही…

वाटते मला बाहेर कुठंतरी
दूरवर प्रवास करावा
आज इथं, उद्या तिथ सैर करावी
तुझ्यासह प्रवाशी व्हावं
पण, खिशात दमडी नाही

सखे, खिशात दमडी नाही
म्हणून हे सारं स्वप्नच आहे…
पण, तुझ्या प्रेमासाठी
या हृदयात श्रीमंतीचं
कोठार भरलेलं आहे…

– देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प

आपले मत इथे नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.